शाहू कोल्हापुरी

कोल्हापूरची खास चप्पल ह्या चपलेचा इतिहास आहे . दर्जा म्हणतात तो हाच .

हि चप्पल कोल्हापुरातलीच खास , वेणीच बारीक नक्षीकाम असो कि मधल्या पट्ट्यावर अस्सल चामड्याचे गोंडे असो …
 एखाद्या कागदावर कराव इतक्या बारकाईने जाड चामड्यावर केलेलं नक्षीकाम हे येऱ्यागबाळ्याच काम नव्हे त्यासाठी अस्सल कलावंतच लागतो अन महाराष्ट्राच्या नशिबाने ते कोल्हापूरन अजून जपलंय …
shahu chappal
 जाड पट्टा अन तांब्याच्या रीबिटचे घाव हि अजून एक ओळख ह्या कोल्हापुरीची …
 बघताच क्षणी नजरेत भरावी अशी रांगडी जोडी कोल्हापूरची खास नसेल अस शक्य आहे का ?