चपलांच गाव (वहाण)

एक सकाळ अशीच उजाडली आदल्या रात्री निघालो होतो मुंबईहून रात्रभर गाडी चालवून सकाळी एका गावात पोहोचलो तेच ते
“चपलांच गाव “वहाणसाठी हिंडण होत राहत रिसर्च किंवा मालाचा नाद काहीही पण जे काही असत ते खुप भारी असत कारण जगात खुप भारी गोष्टी घडतात हे कळायला लागलय आणि अनुभवताहि येत …

या गावात हिंडताना सुद्धा जाणवत कि इथे अस रस्त्यावरसुद्धा चामड्याच्या चपलांचे पट्टे वगैरे सुकायला लागलेले असतात

हिंडताना जाणवल कि ह्या गावची कारागीर मंडळी हि एखाद्या कलामहाविद्यालातल्या शिक्षक विद्यार्थी संख्येपेक्षा जास्तायत ..इतकी कलाकारी एका ठिकाणी असूनही हे दुर्लक्षित का ? असला प्रश्न चघळत चघळतच गावातून  हिंडत होतो …

ह्या गावात जवळपास अक्षरशः घरागनिक(प्रत्येक घरात) कारागीर आहेत बर्याचदा तर एकाहून जास्तच आहेत भाऊमिळून करताना आढळल अन प्रत्येक कारागिराची  कलेवर स्वतःची अशी  स्वतंत्र छाप आहे त्या क्षेत्रात स्वताची ओळख आहे एखाद्या खास डिजाईनच्या ह्यांचा हातखंडा हीच ह्यांची Signature .

मी अश्याच घराघरातून हिंडत होतो वहाणसाठी मालासाठी अन अर्थातच सर्वात महत्वाच त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी कारण वहाणसाठी कारागीरहा कलेइतकाच महत्वाचा आहे

अश्याच एका घरात गेलो जिथे दोन भाऊ तल्लीन होऊन चपला बनवत होते

अस्सल कारागीर होते ते त्यांची कारागिरी अन ते हेच ते जाणो असल काहीतरी बघताक्षणी लक्षात आल , पारंपारिक व्यवसाय अन वडिलोपार्जित मिळालेली कला इतकी भिनलेली कि ते त्यांच काम अगदी सहज करत होते बाहेरच्या जगात हीच कला किती विरळ आहे ह्याची अज्जिबात जाणीव नसलेले ते …

एका सपाट चामड्याच्या चादरीला हव्या त्या डिजाईनमध्ये गुंतवताना करावी लागणारी सगळी काम ते स्वतःच करत होते अगदी पारंगत असल्यागत …


सुरुवात होते ती चपलेच्या साईज नुसार तुकडे कापण्यापासून जाड तुकडे(५ मिमी थोड कमी जास्त ) असूनही हे लोक स्वतःच्या हाताने तुकडे कापतात कारण कमीत कमी चमडवाया जाव हा हेतू , कारण चामडे कारखान्यात बनत नसत त्याच्या शीट आकार हा अनियमित असतो त्यामुळे जास्तीत जास्त वापर करायचा झाल्यास त्याला हाताने कापण त्यांना योग्य वाटत.                                                                            अन असल जाड चामड ते सहज आकारात कापतात एकदा सोल कापल कि चपलेचे पट्टे बनवायचं काम हातात घेतल जात .                    तेव्हा आठवत मशिनीच्या खडखडाटात दिवसरात्र लॉट मध्ये बनणाऱ्या मशिनी जोड्या कुठे अन प्रत्येक जोडी बारकाईने बनणार हे गाव कुठे

इथे प्रत्येक जोडी बारकाईने ह्या कारागीरांच्या हाताखालून जाताना पाहिली की भारी वाटत , ती कला कारीगिरी अन तो कारागीर ह्याचं महत्व नव्याने कळत जेव्हा कलाकुसर होण्याची सुरुवात जोडीच्या न दिसणाऱ्या चामड्याच्या छीलण्यापासून होते कारण तो भाग जरी दिसत नसता तरी त्या भागातल चमड उत्तमच दर्जाच असल पाहिजे तेव्हाच जोडी उत्तम बनेल असल्या हेतूने जेव्हा जोडी बनते तेव्हा ती उत्तमच असते त्यात शंका नाही कारण चांगल्या मालाचा अट्टाहास हा खुद्द कारागिराचा असतो .

चपला बनवताना तिचा सांगाडा जेव्हा बनवायला घेतला जातो तेव्हा तिथल्या कारागिराच्या अनुभवाचा कस लागतो .

मूर्तीचे डोळे बनवताना मूर्तिकाराची जी तंद्री लागते अन त्याच्या कारीगीरीची जी परीक्षा होते अगदी तसच इथ चपला बनवताना कारागिराच होत कारण चप्पल घालताक्षणी “हीच ती” असा अनुभव द्यायचा असल्यास चपलेच फिटिंग हे परफेक्टच असायला हव अन नंतर हे त्यांच ब्रीद होऊन गेलेलं असत कारण त्यांच्यासाठी अजूनही माणुस चप्पल स्पर्शाने ठरवतो अन मग डोळ्याने अन जोड्या बनवताना ह्या दृष्टीकोनातून वहाण बनवन पाहून एकूण भारी वाटत .

एकदा हा सांगाडा बनला कि पुढच कलाकुसर करायचं काम सुरु झालं अन मग इथ स्त्रियांचा रोल सुरु होतो ,

बर्याच प्रकारच्या चामड्याच्या जोड्यांना वेणी अन गोंडे लावलेले असतात त्यात पुन्हा रंगीत गोंडा असतो नाही तर शिलाई असते पट्ट्यावर खास डिजाईन असते दिसण्यासाठीजोडी जास्त आकर्षक होण्यासाठी मग ती काम स्त्रिया करत असतात चामड्याची बारीक वेणी विणायला लागणारी नजर अन बारकावा स्त्रियांकडे उत्तम असतो मग वेण्या विनण शिलाई घालण गोंडे लावण असली काम करून घरातल्या स्त्रिया कामाला फिनिशिंग देऊन मोठ्या प्रमाणात हातभार लावतात , गावात हिंडताना मी  पाहिल त्यावरून शेजारपाजारच्या मिळून काही बायका एकत्र(सहकार पद्धतीने) काम करत होत्या …
आतून चपला तयार  झाल्यावर त्या काही  बाहेर आणून मग बोलत बोलत चपलांच्या पट्ट्यांना शिलाई करून मग त्या pack करायचं काम जवळपास प्रत्येक दाराबाहेर दिसल , गप्पाटप्पा करत मजेत काम सुरु होत.

शाळकरी मुल शाळेत जात होती अभ्यास करत होती पाहून बर वाटल त्याचबरोबर वेळ मिळेल तस तेही घरच्यांना कामात मदत करत होते अन असली हि भारी वाटणारी घटना ह्या गावात रोज रोज अगदी सहज घडत होती आयुष्याचा भाग म्हणून रोज सकाळी इथल्या कित्येक घराची सुरुवात चामड चीलण्याने होते मग भिजवलं जात ओल झालेलं चामड हव्यात्या आकारात कापल जात डिजाईन केली जाते चपलेचा सांगाडा तयार केला जातो महत्वाच नक्षीकाम होत टाचेपासून इनसोल पर्यंत नक्षी देवून कोरीव काम केल जात इतक्या जाड चामड्याची चप्पल शिवली जाते  तोपर्यंत घरातली बाई घरची काम करून तिच्या कामाला तयार झालेली असते मग ती वेणी असो किंवा पट्टे शिवायच्या कामाला हात घालते मग ह्याच  लयात चप्पल बनलेली असते ती जोडी मग व्यवस्थित तपासून रोज तिथ pack होते मग तिचा शहराकड प्रवास सुरु होतो अन हे चपलांच गाव नवीन चपला बनवायला पुन्हा सकाळी सुरुवात करत ….